Crime News: भांडण गेलं टोकाला अन् नवऱ्याने चावलं बायकोच्या बोटाला... गुन्हा दाखल

Crime News
Crime News

Crime News: भांडणाच्या वेळी पत्नीचे बोट चावल्याचा आरोपाखाली बंगळुरूमधील पतीला अटक करण्यात आली आहे. पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्याखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी विजय कुमार याने पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

याप्रकरणी महिलेने पतीविरुद्ध शहरातील कोननकुंटे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

विजय आणि त्याची पत्नी पुष्पा यांच्या लग्नाला 23 वर्षे झाली आहेत. वारंवार भांडणे, गैरसमज यामुळे पुष्पा मुलासोबत दुसऱ्या घरात राहत होत्या. पुष्पा यांच्या तक्रारीनुसार खात्यानुसार, 28 जुलै रोजी दुपारी 4 च्या सुमारास विजय कुमार तिच्या भाड्याच्या घरात गेला आणि त्यांच्यात वाद झाला. (Latest marathi news)

Crime News
e-CARe Platform : परदेशात निधन झाल्यास मृतदेह लगेच आणता येणार मायदेशी; प्रक्रिया जलद करण्यासाठी प्लॅटफॉर्म लाँच

विजयने पत्नी पुष्पाच्या डाव्या हाताचे बोट चावले आणि गिळण्याचा प्रयत्न केला. विजय कुमार विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४९८ अ, ३२५, ५०४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. (crime news)

Crime News
Pune Terrorist: झुल्फिकार बडोदावालाला ११ ऑगस्टपर्यंत ATS कोठडी, दिवेघाटात द्यायचा बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रशिक्षण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com