Crime News: लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी पत्नीने केली पतीची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
Crime News
Crime NewsSakal

Bihar Crime News: बिहारमधील गया येथे एका व्यक्तीच्या हत्येचा खुलासा करत पोलिसांनी मृताच्या पत्नीला अटक केली आहे. लकडाही गावात राहणारे अशोक कुमार यांचा रेवती कुमारीसोबत २९ मे रोजी विवाह झाला होता. अशोकने ३० मे रोजी नववधूला घरी आणले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मे रोजी अशोक अचानक गायब झाला. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीही पत्ता लागला नाही. त्यानंतर त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.

मृत अशोकचा भाऊ धर्मेंद्र याने पोलिसांना सांगितले की, मित्राचा फोन आल्यानंतर त्याचा भाऊ अशोक ३१ मे रोजी सायंकाळी उशिरा बाहेर गेला होता.

यानंतर तो परतला नाही. १ जून रोजी अशोकचा मृतदेह सापडला होता. धारदार शस्त्राने त्याचा गळा कापला होता. यानंतर संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली.

अनैतिक संबंधांमुळे नवरीने नवऱ्याची हत्या केली:

हे प्रकरण गांभीर्याने घेत एसएसपी आशिष भारती यांनी सीटी एसपी हिमांशू यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक सेल आणि पोलिस अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार करून तपास सुरू केला. चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली.

रेवती कुमारी हिचे तिचा चुलत भाऊ उपेंद्र यादव याच्याशी अवैध संबंध होते. हा प्रकार पतीला कळला. त्यामुळे लग्नाच्या विधीदरम्यानच तिने पतीच्या हत्येचा कट रचला. रेवतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने संपूर्ण प्रकरण सांगितले.

Crime News
Mumbai Murder : अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून गर्लफ्रेंडच्या नवऱ्याची केली हत्या, पोत्यात भरून..

पोलिसांनी वधूला अटक केली:

आरोपी रेवतीने पोलिसांना सांगितले की, तिने पतीच्या चुलत भावाला सांगुन ठार मारले. कारण त्याला बेकायदेशीर संबंधांची कल्पना आली होती. एसएसपी आशिष भारती यांनी सांगितले की, अशोक कुमारचा मृतदेह १ जून रोजी सापडला होता.

दुसरीकडे, ६ जून रोजी रेवतीचा चुलत भाऊ उपेंद्र यादव याचाही मृतदेह आमस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीटी रोडवरून सापडला आहे.

मृतदेहावर कोणत्याही जखमेच्या खुणा नव्हत्या. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. उपेंद्र यादवची हत्या कोणी केली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Crime News
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com