Crime News: लग्नासाठी गेली, तिथे आचाऱ्यावर जडला जीव; त्याला धमकी देत करून घेतली पतीची हत्या

या महिलेच्या पतीचा मृतदेह यमुना नदीमध्ये सापडला होता.
Crime News
Crime NewsSakal

उत्तराखंडमधल्या डेहराडून इथून अनैतिक संबंधातून खून झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न सोहळ्यादरम्यान तिथल्या आचाऱ्याशी एका महिलेचे संबंध जुळले आणि त्यातून तिने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केला आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली आहे. ही महिला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

डाकपत्थर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जलालिया पीर परिसरात यमुना नदीमध्ये १९ तारखेला एक मृतदेह सापडला होता. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. पण त्यावेळी मृताची ओळख पटली नव्हती. त्याच्या गळ्यावर काही खुणा आढळल्या होत्या. याच्या दुसऱ्याच दिवशी मृतदेहाची ओळख पटली आणि मृत व्यक्तीचं नाव अरुण कुमार उर्फ जुगनू असल्याचं आढळलं. त्यानंतर त्याचा भाऊ नितीन याने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

Crime News
Nashik Crime News : वडाळी नजीकच्या ‘त्या’ युवकाचा खूनच! खुनाच्या घटनेने वडाळी नजीक हादरले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि माहिती गोळा केली. या दरम्यान पोलिसांना अमरोहामधल्या परम सिंह उर्फ गुड्डू नावाच्या व्यक्तीवर संशय आला. चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की तो आचारी आहे. अरुणची पत्नी रमिता त्याला एका लग्न सोहळ्यामध्ये भेटली होती. त्यानंतर दोघांच्यात जवळीक वाढली.

त्यानंतर रमिताने आपल्या पतीला दोघांच्या मधून बाजूला करण्याबाबत दबाव टाकायला सुरुवात केली. असं न केल्यास तुला खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवेन अशी धमकीही रमिताने गुड्डूला दिली. यानंतर दोघांनी मिळून हत्येचा कट रचायला सुरुवात केली.

Crime News
Nashik Crime News : ‘नशेडी’ म्हणून हिणवल्यानेच ‘त्याने’ केली आत्महत्या; मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल

१८ ऑक्टोबर रोजी अरुणला फोन करून बोलवण्यात आलं. त्यानंतर त्याला दारू पाजली आणि कापडाने गळा घोटून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह दोघांनी यमुना नदीत फेकला. या संपूर्ण हत्याकांडाची माहिती गुड्डूने आपल्या प्रेयसीला दिली. त्यानंतर ती हिमाचलला पळून जायचं नियोजन करू लागली. पण पळून जाण्या आधीच ती पकडली गेली आणि बिंग फुटलं. सध्या या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com