कोविड सेंटरमध्ये आरोपीची दारू पार्टी; फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
Monday, 24 August 2020

कोविड सेंटरमध्ये एका आरोपीने दारूची पार्टी केली. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली. याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

रांची (झारखंड): कोविड सेंटरमध्ये एका आरोपीने दारूची पार्टी केली. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली. याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Live Video: ट्रक आला वेगात अन् गेला वाहून पाण्यात

कतरास पोलिसांनी एकाला अटक केली होती. पण, अटक केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली होती. कोविड सेंटरमध्ये तो दारूची पार्टी करताना दिसत आहे. हातात बेडी असून, दारू ग्लासमध्ये ओतताना दिसत आहे. धनबादमधल्या कोविड सेंटरमधली ही घटना असून, तो राजरोसपणे दारु पिताना दिसत आहे. याच्याकडे दारू कशी आली आणि पोलिस काय करत होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची अब्रु चव्हाट्यावर आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. त्या सेंटर्समध्ये राहण्याबाबत सरकारने काही नियम तयार केले आहेत. मात्र, एका घटनेने झारखंड सरकार आणि पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. राज्य सरकारने एक चौकशी समिती तयार केली असून, दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सोरेन यांनी म्हटले आहे.

गाढविणीच्या एका लिटर दुधाची किंमत किती? घ्या जाणून...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criminal had done liquor party in covid center dhanbad jharkhand photo viral