गाढविणीच्या एका लिटर दुधाची किंमत किती? घ्या जाणून...

soon a donkey dairy to be set up in haryanas hisar and price of milk
soon a donkey dairy to be set up in haryanas hisar and price of milk
Updated on

हिसार (हरियाणा): गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधाला मागणीबरोबरच तिची किंमत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात असते. पण, देशात प्रथमच गाढविणीच्या दुधाची डेअरी सुरू होत असून, एका लिटरची किंमत सात हजार रुपये असणार आहे.

हरियामामधील हिसार शहरामधील नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटरमध्ये गाढविणीच्या दुधाची डेअरू सुरू होत आहे. शिवाय, गाढविणीच्या दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाणार आहे. सध्या डेअरीमधून हलारी जातीच्या गाढविणींचे दूध विकले जाणार असून, त्यासाठी या डेअरीमध्ये हलारी जातीच्या १० गाढविणी आणण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवसातच या डेअरमधून गाढविणीचे दुध विकले जाणार आहे. गाढविणीच्या एका लिटर दुधाची किंमत ७००० रुपये असणार आहे. गाढविणीच्या दुधात अनेक पोषक घटक असल्यामुळेच त्याची किंमत एवढी असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गाढविणीच्या दुधामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय, कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांचा सामना करण्याची क्षमता या दुधामध्ये असल्याचे सांगितले जाते. गाढविणीच्या दुधापासून विविध सौंदर्य प्रसादनेही तयार केली जातात. लवकरच या डेअरीमधून दूध विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com