दिल्लीतील अनधिकृत बांधकामांवरचे संकट कायम

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जुलै 2018

दिल्लीतील अनधिकृत बांधकामांचे सीलिंग किंवा ती पाडण्यावर कोणतीही स्थगिती असणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) स्पष्ट केले. त्यामुळे दिल्लीतील अशा बांधकामांवर संकट निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील अनधिकृत बांधकामांचे सीलिंग किंवा ती पाडण्यावर कोणतीही स्थगिती असणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) स्पष्ट केले. त्यामुळे दिल्लीतील अशा बांधकामांवर संकट निर्माण झाले आहे.

दिल्लीतील अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामांविरुद्ध सीलिंग मोहीम थांबविण्याचे कोणतेही निर्देश दिले नसल्याचे केंद्राने सांगितल्यानंतर न्यायाधीश एम. बी. लोकुर आणि न्यायाधीश दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.

कोठेही अनधिकृत बांधकाम दिसून आल्यास ते तातडीने थांबवावे, असेही निर्देश खंडपीठाने दिले. या मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्यांना पुरेशी सुरक्षा पुरविण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

Web Title: crisis of unauthorized construction in Delhi