esakal | ब्रिटनच्या क्वारंटाइनच्या नियमांवर अदर पुनावालांची सडकून टीका; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

adar.

ब्रिटनच्या क्वारंटाइनच्या नियमांवर अदर पुनावाला बरसले; म्हणाले...

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारत आणि ब्रिटनमध्ये सुरु झालेल्या क्वारंटाईन नियमांच्या वादामध्ये आता सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी उडी घेतली आहे. ब्रिटनमध्ये प्रवेशासाठी तयार केलेल्या नियमांना त्यांनी अराजकता असं संबोधलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने भारतात राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेला मान्यता देण्यास नकार दिला आहे. यामुळे भारतीय नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामध्ये बहुसंख्य लोकांनी कोविशिल्ड लसीचे डोस घेतले आहेत.

हेही वाचा: मला 'या' गोष्टीची लाज वाटते, गडकरींचं नगरमध्ये वक्तव्य

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत अदर पुनावाला म्हणाले, ब्रिटनमधील ही स्थिती पूर्णपणे अराजकतेची आहे. मी सर्व देशांना सोबत येण्यासाठी आवाहन करतो. आपण कमीत कमी त्या लसीला मान्यता देऊ शकता ज्याला डब्ल्यूएचओनं मान्यता दिली आहे, असं आवाहनंही त्यांनी ब्रिटन सरकारला केलं.

ब्रिटनचा मान्यता देण्यास नकार

ब्रिटनने भारताला कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यास नकार दिला आहे. नव्या नियमांनुसार ब्रिटनचा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांना लस न घेतलेली व्यक्ती समजलं जाईल, भलेही त्यांनी दोन्ही डोस घेतलेले असले तरी. कोविशिल्ड ही लस ब्रिटनच्या एस्ट्राजेनेका लसीची भारतीय आवृत्ती आहे. ती त्या सहा लसींपैकी एक आहे ज्याला भारतात मान्यता दिली आहे.

भारतानं दिलं सडोतोड उत्तर

ब्रिटनचे क्वारंटाइन नियम लागू केल्यानंतर भारतानं ब्रिटनला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताकडून ब्रिटिश नागरिकांसाठी दहा दिवसांचा क्वारंटाइन काळ बंधनकारक आहे. हा नवा नियम चार ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

loading image
go to top