
पाकिस्तानातून थेट काश्मिरात बोगदा; BSFनं उधळला दहशतवाद्यांचा कट
जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय सीमेखालून थेट पाकिस्तान निघणारा एक बोगदा आढळून आल्याचा दावा सीमा सुरक्षा दलानं (BSF) केला आहे. या बोगद्याच्या माध्यमातून घुसखोरी करत आगामी अमरनाथ यात्रेत गोंधळ माजवण्याचा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावण्यात आल्याचा दावाही बीएसएफकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळं जम्मू भागात अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा: सदावर्ते पुण्यात येताच मराठा समाज आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
बीएसएफच्या माहितीनुसार, सांबा जिल्ह्यातील चाक फकीरा बॉर्डर आऊटपोस्टजवळ बुधवारी संध्याकाळी हा क्रॉस बॉर्डर बोगदा १५० मीटर लांब आहे. आगामी अमरनाथ यात्रेत गोंधळ माजवण्याचा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा डाव होता, तो यामुळं उधळण्यात आला आहे, असं बीएसएफचे डीआयजी एस पी एस सिंधू यांनी म्हटलं आहे.
बोगदा खोदण्यामागील नियोजन काय?
हा बोगदा पाकिस्तानच्या बाजूनं खोदण्यात आला असून तो अलिकडेच खोदण्यात आलाय. या बोगद्याचं प्रवेशद्वार हे दोन फुटाचं असून त्याच्या भारताच्या बाजूनं बाहेर पडण्याच्या टोकाकडे २१ वाळूची पोती रचण्यात आली आहेत. बाहेर पडतानाचं भगदाड हे बुजवलं जाऊ नये ते मजबूत रहावं यासाठी ही वाळूची पोती रचण्यात आली आहेत. दिवसभरातील गस्ती दरम्यान हा बोगदा आढळून आली.
हा नव्यानं खोदण्यात आलेल्या बोगद्याचं आंतरराष्ट्रीय सीमेपासून अंतर १५० मीटर असून बॉर्डरवरील कुंपणापासून पाकिस्तानची चेक पोस्टच्या (चमन खूर्द) विरुद्ध बाजूला ५० मीटर अंतरावर आहे. तर भारताच्या बाजूनं हा बोगदा ९०० मीटर अंतरावर आहे. या बोगद्याची प्रवेशाची बाजू बॉर्डर आऊट पोस्ट चॅक फकीरापासून ३०० मीटरवर तर भारताच्या शेवटच्या गावापासून ७०० मीटर अंतरावर आहे, अशी माहिती डीआयजी संधू यांनी दिली.
आत्मघाती दहशतवाद्यांचा नुकताच केला होता खात्मा
२२ एप्रिल रोजी जम्मू्च्या सुंजवन भागात सीआयएसएफच्या एका बसवर दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये या दोघांचा सुरक्षा रक्षकांनी खात्मा केला होता. तर एक सहाय्यक सब-इन्स्पेक्टर शहीद झाला होता. या घटनेनंतर हा बोगदा उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
Web Title: Cross Border Tunnel Detected Along Ib In Jk And Pakistan Says Bsf
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..