
सदावर्ते पुण्यात येताच मराठा समाज आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
एसटी कामगार संघटनेच्या आंदोलनातील नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली. दरम्यान, या वेळी मराठा क्रांती मोर्चा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सदावर्ते यांना न्यायालयाने जामीन दिला असला तरी राज्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल आहेत. आज पुण्यात पोलीस चौकशीसाठी आल्यानंतर त्यांना मराठा समाजाने विरोध केला. (Maratha Leader Protest Gunratna Sadavarte in Pune )
गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोलीस स्टेशनच्या बाहेर दाखल झाले. सदावर्ते यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवरायांच्या वंशजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होत. त्याचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतलं. कार्यकर्त्यांनी सदावर्तेंविदरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हेही वाचा: गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिस उचलण्याच्या तयारीत
गुणरत्न सदावर्ते यांची दोन तास चौकशी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी ॲड. सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सदावर्ते यांना काल मंगळवारी दुपारी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास चौकशीसाठी बोलावले. सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली.
त्यानंतर सदावर्ते प्रसारमाध्यमांशी न बोलता बाहेर पडले. सदावर्ते हे त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर, राजेंद्र कुंजीर यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
सदावर्ते यांचा ऑन कॅमेरा जबाब
पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा इन कॅमेरा जबाब नोंदविला आहे. त्यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. परंतु नेमकी चौकशी काय झाली याबाबत वरिष्ठ अधिकारी सांगू शकतील, असे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांनी सांगितले.
विजय पुराणिक पोलीस निरीक्षक
कोर्टाच्या आदेशानुसार सदावर्ते यांची चौकशी सुरू
व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले
पुढील तपास सुरू आहे. ज्या वेळी चौकशीला बोलावण्यात येईल तेव्हा यावं लागेल
एकूण अडीच तास चौकशी करण्यात आली
साक्षीदारांच्या सह्या ऑन कॅमेरा चौकशी करण्यात आली
Web Title: Maratha Leader Protests Against Gunaratna Sadavarte In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..