'दहशतवाद्यांना पाककडून मिळतात एक कोटी'

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुझफ्फराबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर निरागस असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा वेळोवेळी उघड होत असतो. त्याचे पुरावेही मिळत असतात. त्यात आणखी एक भर पडली असून पाकची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात येण्यासाठी दहशतवाद्यांना एक कोटी रुपये देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पाकव्याप्त जम्मू-काश्‍मिरमधील जम्मू-काश्‍मिर अमन फोरमचे नेते सरदार रईस इक्‍बाल यांनी हा धक्‍कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानला उद्देशून ते म्हणाले, "तुम्ही हल्लेखोरांना भाड्याने घेता. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून त्यांना मानवी बॉम्ब किंवा दहशतवादी बनवण्यासाठी तुम्ही एक कोटी रुपये देता. हेच तणावाच्या परिस्थितीचे प्रमुख कारण आहे. आम्ही या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. जर तुम्हाला गोळीबार करायचा छंद असेल तर लष्करासोबत करा.' पाकिस्तानला तीव्र शब्दांत खडे बोल सुनावत इक्‍बाल पुढे यांनी "पाकिस्तानच्या राष्ट्रीय धोरणानुसार ज्या दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे त्यांना पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये मुक्त का सोडले जाते?' असा प्रश्‍न उपस्थित केला.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 2003 साली शस्त्रसंधी करार झाला होता. मात्र या कराराचा वेळोवेळी भंग करण्यात येतो. याच वर्षी भारत-पाकच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर या कराराचा तब्बल 440 वेळा भंग करण्यात आला आहे.

Web Title: To cross LoC, Pakistan pays Rs 1 crore per terrorist: PoK leader