esakal | पत्नीची हत्या करून जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून घेत केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

gun

जवानाने आपल्या मुलीवरही काही गोळ्या झाडल्या परंतु, ती यातून वाचली. त्यानंतर त्याने मृत पत्नीच्या जवळ जाऊन स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्त्या केली. 

पत्नीची हत्या करून जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून घेत केली आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर - CRPF जवानाने आपल्या पत्नीचा खून करुन नंतर स्वत:ही आत्महत्त्या केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार आज रविवारी घडल्याचे समोर आले आहे. या जवानाचे नाव काँस्टेबल मदन सिंग आहे. हा जवान जम्मूमधील आपल्या नातेवाईकांच्या घरी आपल्या पत्नीसोबत होता. प्रथमदर्शनी कळालेल्या माहीतीनुसार जवानाचे त्याच्या पत्नीसोबत आणि वहिनीसोबत खटके उडून भांडण झालं होतं. 

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सेक्टर मुख्यालय जम्मूमधील तैनात काँस्टेबल मदन सिंह (३८) हा आपली सर्व्हीस रायफल सोबत घेऊन आपल्या नातेवाईकांच्या घरी गेला होता. तिथे त्यांची पत्नी दीप्ती रानी (३५) आणि वहिनीसोबत त्याचं कडाक्याचं भांडण झालं. रागारागात केलेल्या गोळीबारात त्याची पत्नी जागीच ठार झाली. तर वहिनीने जखमी अवस्थेत तातडीने दवाखाना गाठला.

हे वाचा - माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन; एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

घटना घडली त्यावेळी CRPF जवानाची ८ वर्षांची मुलगीदेखील घटनास्थळी उपस्थित होती. पण तिला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नसल्याचे समजते. पोलिसांनी या घटनेबाबत गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

पोलिसांनी सांगितले की, रात्री साडेदहा वाजता जवान घरी आला तेव्हा अत्यंत चिडलेल्या अवस्थेत होता. रागारागात त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. या साऱ्या झटापटीत पत्नीची बहीण देखील जखमी झाली. जवानाने आपल्या मुलीवरही काही गोळ्या झाडल्या परंतु, ती यातून वाचली. त्यानंतर त्याने मृत पत्नीच्या जवळ जाऊन स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्त्या केली.

हे वाचा - फेक फोटो शेअर केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या नेत्याला अटक

पोलिसांनी सांगितलं की, दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले गेले आहे. जखमी महिलेला दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे. अर्धसैनिक दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सीआरपीएफने या घटनेची नोंद घेतली आहे. या प्रकरणाचा विभागीय तपासही सुरु केला आहे.