Crime News : सीआरपीएफ जवानाने महिला पोलिस अधिकाऱ्याची गळा दाबून केली हत्या, पोलिस स्टेशनमध्ये गेला अन्...
Crime News : शनिवारी रात्री उशिरा अरुणा आणि तिचा मित्र दिलीप डांगचिया यांच्यात एखाद्या गोष्टीवरून जोरदार भांडण झाले. त्यानंतर दिलीपचा राग अनावर झाला आणि अरुणाचा गळा दाबून हत्या केली.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील अंजार पोलिस ठाण्यातील एएसआय अरुणाबेन नटुभाई जाधव (वय २५) यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. महिला अधिकाऱ्याच्या मित्राने तिच्या घरी गळा दाबून हत्या केली. सध्या पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.