

CRPF Jawan Returns to Duty After 25 Years of Legal Battle
esakal
एकेकाळी सीआरपीएफमध्ये कार्यरत असणारे गिरवर सिंह तोमर यांच्यावर वरिष्ठांसोबत वादानंतर विभागीय कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे त्यांना नोकरीतून बडतर्फ केलं होतं. बडतर्फीच्या कारवाईनंतर गिरवर सिंह थेट संत बनले होते. भगवी वस्त्रं, वाढलेली दाढी, गळ्यात माळा घालून ते मंदिरात वास्तव्य करत होते. मात्र पुन्हा वर्दी मिळवण्याची आशा सोडली नाही. कायदेशीर लढाई लढत अखेर २५ वर्षांनी पुन्हा सीआरपीएफच्या वर्दीत ते दिसत आहेत.