Udaipur murder: Udaipur murder: धमक्यांमुळे कन्हैयालाल घरीच होते, मंगळवारी दुकानात गेले अन्.... ; पत्नीने सांगितला ३ आठवड्याचा घटनाक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udaipur murder: धमक्यांमुळे कन्हैयालाल घरीच होते, मंगळवारी दुकानात गेले अन्.... ; पत्नीने सांगितला ३ आठवड्याचा घटनाक्रम

Udaipur murder: धमक्यांमुळे कन्हैयालाल घरीच होते, मंगळवारी दुकानात गेले अन्.... ; पत्नीने सांगितला ३ आठवड्याचा घटनाक्रम

राजस्थानमधील उदयपूर शहरात दिवसाढवळ्या दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एवढेच नाही, तर आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, त्याच्या पत्नीने 'आरोपींना फाशी द्या, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: Udaipur Murder : ऑनलाईन कोर्स ते जिहादी बनण्यासाठी दावत-ए-इस्लामीचे स्पेशल ट्रेनिंग

कन्हैया लाल पतीच्या हत्येनंतर पत्नीने आज त्यांनी आम्हाला मारलं, उद्या दुसरं कोणाला तरी मारतील. त्यामुळे त्यांना फाशी द्या अशी मागणी केली आहे. कन्हैयाच्या पत्नीसोबत त्याच्या कुटूंबातील इतर सदस्यांनीही संताप व्यक्त केला. ''आज मामा आमच्या घरातून मारला गेला आहे, उद्या दुसऱ्याच्या घरातून मारले जातील. त्यामुळे आरोपींना कोणत्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा झाली पाहिजे.'' असा संताप कन्हैयाच्या भाचीने व्यक्त केला.

तीन दिवसांपूर्वीच तो परतला होता

भूत महल मार्केटप्लेसमधील दुकानदारांनी दावा केला आहे की पीडित कन्हैया लालने भाजप नेत्या नुपूर शर्माला पाठींबा दिल्याने त्याला धमक्या मिळाल्या होत्या आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. "त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याने अनेक दिवस दुकान उघडले नाही. तीन दिवसांपूर्वीच तो परतला होता," मोहन, व्यापारी यांनी सांगितले.

हेही वाचा: उदयपूर हत्याकांडाचा तपास NIA कडे, केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश

पोलिसांकडून सुरक्षा मागविण्यात आली होती

कन्हैयालालने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, नाजीम आणि त्याच्यासोबतचे ५ लोक त्याच्या दुकानाची रेकी करत आहेत. ते मला दुकान उघडू देत नाहीत. माझे दुकान उघडताच हे लोक मला मारण्याचा प्रयत्न करतील. नाझीमने सोसायटी ग्रुपमध्ये माझा फोटो व्हायरल केला आहे. ही व्यक्ती कुठेही दिसली किंवा दुकानात आली तर त्याला मारून टाका, असे सर्वांना सांगण्यात आले आहे. हे लोक दबाव टाकत आहेत की मी दुकान उघडले तर मला मारले जाईल. इतकेच नाही तर कन्हैयालालने नाझीमसह अन्य आरोपींवर कारवाई करण्याची मागणीही केली होती. तसेच सुरक्षेची मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा: GST Council Meeting: वाढता टॅक्स लावणार खिशाला कात्री, हॉटेलमध्ये राहणे, पनीर खाणे आता महागणार

या घटनेनंतर संपूर्ण उदयपूर शहरात तणावाचे वातावरण आहे. शेकडो लोक आपला निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर उदयपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात कलम-144 लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवाही 24 तास बंद ठेवण्यात आली आहे.

Web Title: Crying Kanhaiyalal Wife Said Hang The Accused Otherwise These People Will Kill Someone Else Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimemurder case