Udaipur Murder : ऑनलाईन कोर्स ते जिहादी बनण्यासाठी दावत-ए-इस्लामीचे स्पेशल ट्रेनिंग

ही संस्था 100 हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे आणि इस्लामच्या प्रचारासाठी विविध ऑनलाइन अभ्यासक्रमही चालवत आहे.
Udaipur
Udaipur Sakal

उदयपूर : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीची काल उदयपूर येथील दुकानात घुसून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेमागे पाक कनेक्शन समोर आले आहे. कन्हैयाची गळा चिरून हत्या करणारे दोन्ही आरोपी पाकिस्तानच्या दावत-ए-इस्लामी संघटनेशी (Dawat-E- Isalami Organisation) संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. ही संस्था 100 हून अधिक देशांमध्ये सक्रिय आहे आणि इस्लामच्या प्रचारासाठी विविध ऑनलाइन अभ्यासक्रमही चालवत आहे. यापूर्वी भारतातील या इस्लामिक संघटनेवरही धर्मांतराचे आरोप झाले आहेत. या संस्थेकडून ठिकठिकाणी दानपेट्या ठेवल्या जात असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. त्याच्यामार्फत येणारा पैसा चुकीच्या कामात वापरला जातो, असा आरोप आहे. आज आपण दावत-ए-इस्लामी त्याचे नेटवर्क आदींबद्दल जाणून घेणार आहोत. (Udaipur Murder News In Marathi)

Udaipur
उदयपूर हत्याकांडाचा तपास NIA कडे, केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश

दावत-ए-इस्लामी काय ?

दावत-ए-इस्लामी एक गैर-राजकीय इस्लामिक संघटना म्हणून स्वतःची ओळख सांगते. या संघटनेची स्थापना 1981 मध्ये कराची, पाकिस्तान येथे झाली. मौलाना अबू बिलाल मुहम्मद इलियास याने या इस्लामिक संघटनेची स्थापना केली. ही संस्था गेल्या चार दशकांपासून भारतात कार्यरत आहे. शरियत कायद्याचा प्रचार करणे आणि त्यातील शिकवण अंमलात आणणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. सध्या या संस्थेने 100 हून अधिक देशांमध्ये आपले जाळे पसरवले आहे.

कोणते 32 ऑनलाइन अभ्यासक्रम चालवते?

दावत-ए-इस्लामीची स्वतःची वेबसाइट आहे. वेबसाइटच्या माध्यमातून ही इस्लामिक संघटना धर्मांध मुस्लिम बनण्यासाठी शरिया कायद्यांतर्गत इस्लामिक शिकवणीचा ऑनलाइन प्रचार करत आहे. सुमारे 32 प्रकारचे इस्लामिक अभ्यासक्रम या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. पुरुष आणि महिला दोघांसाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. याशिवाय ही संघटना मुस्लिमांना कुराण आणि शरिया कायद्यासाठी सर्वोतोपरी तयार करण्याचे काम करते. (Online Course )

Udaipur
१७ जूनलाच हत्येची घोषणा; कन्हैयाच्या मुलाने अनवधानाने पोस्ट केली शेअर

जिहादी बनण्यासाठी दिले जाते विशेष प्रशिक्षण

दावत-ए-इस्लामी संघटनेवरही अनेकवेळा धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. संस्था त्यांच्या वेबसाइटवर न्यू मुस्लिम कोर्स देखील चालवते. जो पूर्णपणे ऑनलाइन असून, धर्मांतर करून मुस्लिमांना इस्लामिक शिकवणींची ओळख करून देणे हा या मागचा उद्देश आहे. या कोर्सद्वारे धर्मांतर करणाऱ्यांना जिहादी (Jihadi) बनण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

दोन्ही आरोपी ऑनलाईन अभ्यासक्रमाशी संबंधित होते

उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या करणारे आरोपी मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद हे दोघेही 'दावत-ए-इस्लामी' नावाच्या संघटनेशी संबंधित असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. हे दोघेही इस्लामिक संघटनेच्या ऑनलाइन कोर्सशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. हत्येनंतर दोन्ही आरोपी अजमेर दर्गा झियारतकडे जाणार होते. मात्र, त्यापूर्वीच या दोघांना अटक करण्यात आले. उदयपूरमध्ये घडलेल्या या हत्येच्या तपासासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली असून, एसआयटीचे पथक उदयपूरला पोहोचले आहे. एवढेच नव्हे तर, या हत्या प्रकरणाचाही तपास एनआयए करणार आहे.

Udaipur
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवले, कायदा काय सांगतो?

दिल्ली आणि मुंबई येथे मुख्यालय

दावत-ए-इस्लामी या संघटना भारतात 1989 मध्ये सुरू झाली. त्यानंतर पाकिस्तानातील उलेमाचे शिष्टमंडळ भारतात आले. यानंतर ही संघटना हळूहळू भारतात आपली पाळेमुळे घट्ट करत गेली. या संस्थेचे मुख्यालय मुंबई आणि दिल्ली येथे आहे. त्याचे बहुतेक सदस्य हिरवा पकडी बांधतात. संस्थेचा संदेश देण्यासाठी या संस्थेने मदनी चॅनलही तयार केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com