लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न, नाशिकमध्ये पुन्हा तोतया मेजर गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fake Army Major and his accomplice were arrested from the Army premises at deolali Camp

लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न, नाशिकमध्ये पुन्हा तोतया मेजर गजाआड

नाशिक : नाशिक रोड तोफखाना केंद्रात रेकी करत, आर्मीचा गणवेश घालून लष्कराच्या छावणीत लष्करी अधिकाऱ्याच्या गणवेशात फिरणाऱ्या एका तोतयाला मेजरला अटक करण्यात आल्यानंतर देवळाली लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका अशाच तोतया मेजरला गजाआड करण्यात आले आहे. मागील दोन आठवड्यात ही दुसरी घटना आहे.

काल बुधवारी (ता ५) दुपारी अडीचल देवळाली कॅम्प येथील लष्कराच्या हद्दीतील गेट नंबर 7 येथील ड्युटीवर असलेल्या आर्मीच्या गार्डला अवेंजर गाडी वर आर्मी असे लिहिलेल्या इसम मोहम्मदअसद मुजिबुल्लाखान पठाण, मौलाना (राहणार रेहमान नगर, देवळाली कॅम्प) दिसला सदर आर्मी गार्डने त्याला त्याचे ओळखपत्र मागितले असता त्याने मी माजी सैनिक आहे आणि एक्स इंडियन आर्मी सिक्युरिटी सर्विसेस असे नाव लिहिलेले ओळख पत्र दाखवले. ओळखपत्र बनावट आहे हे लक्षात आल्यानंतर आर्मी जवानाने आर्मी इंटेलिजन्स दक्षिण कमांड पुणे यांच्या देवळाली कॅम्प येथील पथकाला आणि सेना पोलीस यांना कळवले.

हेही वाचा: नाशिकमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागणार? छगन भुजबळ यांनी दिले संकेत

आर्मी इंटेलिजन्स आणि सेना पोलिसांनी कसून चौकशी केली असता असे समजले की, सदर ओळखपत्र आफताफ मन्नान शेख उर्फ मेजर खान (राहणार आडके नगर देवळाली कॅम्प) याने बनवून दिलेले असल्याचे समोर आले. मिलिटरी इंटेलिजन्सच्या रडारवर तोतया मेजर खान हा मागील एक वर्षापासून होता परंतु तो खूप चालाख असल्यामुळे पकडला जात नव्हता. सदर मेजर खान ह्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले असता, तो महिंद्रा थार ह्या गाडीमधून आला, सदर गडीवर्ती आर्मी असे लिहलेले होते. चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांचेही मोबाईल चेक केले असता त्यामध्ये आर्मी युनिफॉर्म घातलेले फोटोज तसेच ओळखपत्र आणि तोतया मेजर खान यांचे संशयास्पद फोटो आढळून आले.

दोघांची संशयास्पद आर्मी एरियातील हालचाली हे लक्षात घेता आणि त्यांचा उद्देश हे सर्व माहिती करून घेण्याकरता देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा: पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाचीच, पण घटनेला दोन बाजू - छगन भुजबळ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top