आता १३ प्रादेशिक भाषेत होणार प्रवेश परीक्षा; UGCचा मोठा निर्णय

सर्व UGC अनुदानित केंद्रीय विद्यापीठांमध्ये हा निर्णय लागू केला जाणार आहे
UGC
UGCसकाळ डिजिटल टीम

विद्यापीठ अनुदान आयोगानी ((University Grants commission) महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता कॉमन एंट्रेंस टेस्ट (Common University Entrance Test ) देण्यासाठी भाषा मर्यादा राहणार नसून मराठी, गुजराती, हिंदी सह 13 प्रादेशिक भाषांमध्ये Entrance Test देता येणार असल्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतला आहे. 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व UGC अनुदानित केंद्रीय विद्यापीठांमध्ये हा निर्णय लागू केला जाणार आहे. (CUET for admission in UG programs will be conducted in 13 languages)

UGC
मोदीजी जनतेला तुमचे 'अच्छे दिन' नको आहेत; काँग्रेसचा हल्लाबोल

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत काही सूचना केल्या. त्यानुसार विद्यापीठांमध्ये सर्व अंडरग्रॅज्युएट कोर्सेसच्या प्रवेशसाठी यूनिव्हर्सिटी कॉमन एंट्रन्स टेस्ट (CUCET) च्या पद्धतीचे निरीक्षण करण्यासाठी एक समिती बनविण्यात आली होती. देशभरातील सर्व 45 विद्यापीठात पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कॉमन एंट्रेंस टेस्ट अर्थात CUET अनिवार्य आहे. आता भाषेची मर्यादा नसल्याने देशातील कुठल्याही विद्यार्थ्यांना कुठल्याही विद्यापिठात प्रवेश घेता येणार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com