काश्मीरः 133व्या दिवशीही अस्वस्थता कायम

यूएनआय
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

श्रीनगरः हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱहाण वणी याच्या एन्काऊंटरनंतर अशांत झालेले काश्मीर खोरे आज (शुक्रवार) 133 व्या दिवशीही अस्वस्थ होते. नऊ जुलैनंतरच्या दर शुक्रवारप्रमाणेच आजही काश्मीर खोऱयातील जनजीवन विस्कळित राहिले. काश्मीरसह खोऱयातील अशांत भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दले आणि पोलीस तैनात आहेत. 

फुटीरतवावाद्यांनी शनिवारपासून दोन दिवस आंदोलनांना उसंत जाहीर केली आहे. मात्र, त्यांनी आंदोलनांचा 24 नोव्हेंबरपर्यंतचा टप्पाही जाहीर केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खोऱयात कुठेही संचारबंदी अथवा प्रतिबंध लागू नाही; तथापि मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात केली आहे. 

हुरियत कॉन्फरन्स आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या दोन फुटीरतवादी संघटनांनी नऊ जुलैपासून काश्मीरमध्ये अशांतता माजवली आहे. या संघटन दर काही दिवसांनी आंदोलनांचा पुढील टप्पा जाहीर करतात. संघटनांनी येत्या शनिवारी आणि रविवारी कुठेही आंदोलन होऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. त्याचवेळी सोमवारपासून 24 नोव्हेंबरपर्यंतच्या आंदोलनांचा टप्पाही जाहीर केला आहे. 

एेतिहासिक जामा मशिदीमध्ये आज कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. मशिदीचा भाग म्हणजे मवाळ हुरियत नेता मिरवेझ मौलवी उमर फारूक यांचा बालेकिल्ला मानला जातो. मशिदीत जाण्याचे सर्व प्रमुख मार्ग सुरक्षा दलांनी बंद केले आहेत. तेथे नऊ जुलैनंतर शुक्रवारची नमाज अदा करण्याची परवानगी दिली गेलेली नाही.

काश्मीर शहराच्या मध्यवर्ती भागात कोणतेही निर्बंध नसूनही व्यवहार बंदच आहेत. वाहतूकही अत्यंत तुरळक आहे. सरकारी कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱयांच्या निवासस्थान परिसरात मात्र आज अनेक दिवसांनी व्यवहार सुरळीत सुरू होते. वाहनांची वर्दळ, फळभाजी विक्रेते आदींनी हा परिसर गजबजलेला होता. 

'युएनआय'च्या प्रतिनिधीने सकाळी लाल चौक, घंटाघर आदी मध्यवर्ती भागाची पाहणी केली असता अनेक रस्ते अजूनही बंद असल्याचे दिसून आले. मात्र, दिवसेंदिवस परिस्थिती सुधारत असल्याचे निरीक्षण प्रतिनिधीने नोंदविले. 

Web Title: curfew continue in jammu-kashmir