Mathura Loksabha : राममंदिराची लाट की विकासाचा मुद्दा? हेमा मालिनी यांच्या ‘हॅट्‌ट्रिक’ची उत्सुकता

Hema malini: राममंदिराची लाट की विकासाच्या मुद्द्यावर स्थानिकांमध्ये असलेली अस्वस्थता यावर मथुरेचा निकाल ठरेल
hema malini
hema maliniesakal
Updated on

नवी दिल्ली ः लोकसभेत ८० खासदार पाठविणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या बहुचर्चित मथुरा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. इथे सलग दोन वेळा विजय मिळविणाऱ्या भाजप नेत्या आणि अभिनेत्री हेमामालिनी पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. त्यांना यंदा विजयाची हॅट्‌ट्रिक साधणे शक्य होईल का, याबाबत राजकीय विश्लेषकांना उत्सुकता आहे. तसेच, राममंदिराची लाट की विकासाच्या मुद्द्यावर स्थानिकांमध्ये असलेली अस्वस्थता यावर मथुरेचा निकाल ठरेल.

hema malini
Nagpur News : ‘ड’ वर्ग ग्रंथपालास ना ‘मान’ ना ‘धन’ ; मजुरापेक्षाही कमी वेतन

धक्कादायक निकाल देणारा मतदार संघ म्हणून मथुराची ओळख आहे. या मतदारसंघात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही अनामत रक्कम जप्त झाली होती. १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी जनसंघातर्फे मथुरामध्ये उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती आणि अपक्ष उमेदवार राजा महेंद्रप्रताप खासदार झाले होते.

hema malini
Nashik Crime News : अवैध धंद्यांविरोधात शहर पोलिसांची धडक कारवाई; आचारसंहितेच्या महिनाभरात 38 लाखांचा मुद्देमाल जप्त

हेमामालिनींचा मुकाबला करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि कॉंग्रेसच्या आघाडीतर्फे काँग्रेसने मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे. तर, बहुजन समाज पक्षाचे सुरेश सिंह हे देखील निवडणूक लढवत आहेत. मथुरा हा जाटबहुल मतदार संघ असल्याने कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षानेही जाट उमेदवार दिले आहेत. या तिघांसह मथुरा लोकसभा मतदारसंघात एकूण १४ उमेदवार मैदानात आहेत. मात्र येथील लढत तिरंगी असेल.

राममंदिराचा मुद्दा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि राष्ट्रीय लोकदलाशी झालेली मैत्री याचा राजकीय लाभ हेमामालिनींना अपेक्षित असला तरी जाट समुदायामधील नाराजीचा मुद्दा भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. अभिनेता पती धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या विवाहामुळे आपणही जाट आहोत, असे सांगून हेमामालिनी जाट समुदायाची सहानुभूती मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

२०१४ पासून मथुरेच्या खासदार असलेल्या हेमामालिनी यांना स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरही मतदार प्रश्न करू लागले आहेत. असे असले तरी, स्थानिक राजकीय गणितांमध्ये तूर्तास तरी भाजपची बाजू वरचढ दिसते आहे. मथुरा लोकसभा मतदारसंघात छटा, मंत, गोवर्धन, मथुरा आणि बलदेव या पाच विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. पाचही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. विशेष म्हणजे मागील दोन निवडणुकात भाजप आणि राष्ट्रीय लोकदल यांचा सामना रंगला होता. २०१९ मध्ये भाजपच्या हेमामालिनी यांनी २.९३ लाख मतांनी राष्ट्रीय लोकदलाच्या कुंवर नरेंद्रसिंह यांचा पराभव केला होता. तर त्याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, हेमामालिनी यांनी राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांना ३.३० लाख मतांनी पराभूत केले होते. आणि दोन्हीही वेळा हेमामालिनी यांनी निवडणूक जिंकली होती. यावेळी राष्ट्रीय लोकदलाने भाजपशी हातमिळवणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com