नोटाबंदीमुळे व्याजदर, कर कमी होतील - मेघवाल

पीटीआय
सोमवार, 5 डिसेंबर 2016

वस्तू व सेवाकर (जीएसटी) विधेयक संमत झाल्याने जम्मू आणि काश्‍मीर राज्यात या विधेयकाची अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे. जीएसटीला काही राज्ये विरोध करीत असून, लवकरच यावर सर्वसहमती होईल.
- अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

जम्मू - सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे व्याजदर आणि कराचे दर लवकरच कमी होतील, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी रविवारी दिली.

लघुउद्योग भारती या परिषदेत बोलताना मेघवाल म्हणाले, ""नोटाबंदीमुळे लवकरच व्याजदर आणि कर कमी होतील. नोटाबंदीच्या निर्णयावर सरकार संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, विरोधकांनाच हे नको आहे. पहिल्यांदा विरोधकांनी संसदेत चर्चेची मागणी केली. त्यानंतर 16 नोव्हेंबरला राज्यसभेत चर्चा सुरू झाली. परंतु, विरोधकांनी लोकसभेत चर्चेची माणी केली. आम्ही त्यांनी राज्यसभेत चर्चा सुरू झाली असून, लोकसभेतही होईल, असे सांगितले होते.''

'पंतप्रधान सभागृहात आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्याकडे माफीनामा मागितला. अन्यथा कामकाज बंद पाडण्याची धमकी दिली. यावर पुढील आठवड्यात लोकसभा आणि राज्यसभेचे अध्यक्ष तोडगा काढतील,'' असे त्यांनी नमूद केले.

Web Title: currency ban interest, taxes will be reduced