
Viral Video: शाळेतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिमुकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या शिक्षिकेनंच हा व्हिडीओ शेअर केलाय. शिक्षिका अडवण्याचा प्रयत्न करते तेव्हा चिमुकला त्याचं दफ्तर हिसकावून घेतो. शिक्षिकेनं पकडताच ढसाढसा रडतोसुद्धा. अरुणाचल प्रदेशातला हा व्हिडीओ असून त्याची शिक्षिका सोनम जांगमू यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओला मिलियन्समध्ये व्हयूज आहेत. शाळेच्या गेटमधून चिमुकला रडतच पळून जाताना दिसतोय.