
झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जमशेदपूरमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. यामुळे १६२ मुलं पुरात अडकली होती. पण वेळीच पोलीस आणि प्रशासनाने बचावकार्य राबवल्यानं सर्व मुलांना सुखरुप वाचवण्यात यश आलंय. जमशेदपूरच्या पोटका इथं लव कुश निवासी विद्यालयात पुराचं पाणी शिरलं. या परिसरातील घरांमध्येही पाणी घुसलं होतं. शाळेत पाणी येताच विद्यार्थी घाबरले आणि छतावर जाऊन बसले.