Supreme Court : झाडे तोडणे हे माणसाची हत्या करण्यापेक्षाही वाईट; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निर्णय
Crime News : कायदा आणि झाडे यांना कोणी हलक्यात घेऊ शकत नाहीत आणि घेऊ नये, असा स्पष्ट संदेश गुन्हेगारांना दिला पाहिजे, अशी वरिष्ठ वकील एडीएन राव यांची सूचना खंडपीठाने मान्य केली. किती दंड आकारावा याचे मानक न्यायालयाने आपल्या आदेशाने निश्चित केले आहे.
मोठ्या प्रमाणात झाडे तोडणे हे माणसाला मारण्यापेक्षाही वाईट आहे आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्यांवर दया दाखवली जाऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बेकायदेशीरपणे तोडलेल्या प्रत्येक झाडासाठी न्यायालयाने १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.