

Cyclone Akwan is likely to develop over the Bay of Bengal and bring heavy rainfall to Tamil Nadu and southern Andhra Pradesh
esakal
बंगालच्या उपसागरात आणखी एका शक्तिशाली चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘अक्वान’ असे या संभाव्य चक्रीवादळाचे नाव असून, नोव्हेंबर महिन्यातील हे तिसरे चक्रीवादळ ठरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे खोल दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी सकाळी विशेष बुलेटिन जारी करून या हवामान प्रणालीच्या हालचालींबाबत माहिती दिली. या चक्रीवादळामुळे तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.