Cyclone Arnab Photo: भारतावर चक्रीवादळाचे संकट! अंतराळातून टिपले पृथ्वीचे फोटो... भीषण दृश्य, अनेक राज्यांना धोका

Cyclone Arnab Crosses Andhra Pradesh and Yanam Coast: चक्रीवादळ अर्नबने आंध्र प्रदेश आणि यानमची किनारपट्टी ओलांडली. उपग्रहाच्या छायाचित्रात ढगांचा मोठा विस्तार दिसला असून, मुसळधार पाऊस आणि पुराचा धोका कायम आहे.
INSAT-3DS satellite imagery captured on October 28, 2026, shows extensive cloud formations associated with Cyclone Arnab over parts of eastern and southern India and the Bay of Bengal

INSAT-3DS satellite imagery captured on October 28, 2026, shows extensive cloud formations associated with Cyclone Arnab over parts of eastern and southern India and the Bay of Bengal

esakal

Updated on: 

चक्रीवादळ अर्नबने आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनारपट्टीला २८ ऑक्टोबर रोजी धडक दिली. या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किलोमीटर होता, तर वाऱ्याच्या जोरदार झोतांचा वेग ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचला. दरम्यान, भारताच्या इन्सॅट-३डीएस या हवामान उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रात चक्रीवादळाच्या ढगांचा मोठा विस्तार दिसून आला आहे. या ढगांनी पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक भागांसह बंगालच्या उपसागरापर्यंतचा परिसर व्यापल्याचे चित्रातून स्पष्ट झाले आहे. किनारपट्टी ओलांडल्यानंतर चक्रीवादळ जमिनीच्या दिशेने पुढे सरकत असून, त्याचा धोका तातडीने संपणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. काही भागांत मुसळधार पाऊस, पाणी साचणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com