Cyclone Fani : ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं 'फणी' वादळ

Cyclone Fani : ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं 'फणी' वादळ

भुवनेश्वर: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फणी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. त्यामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. 175 किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक वेगानं फणी वादळाने ओडिशात धडक दिली आहे.

ओडिशानंतर फणी वादळ पश्चिम बंगालला धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी 11 नंतर वादळाचा वेग कमी होण्याची शक्यता असून सध्या पुरीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. फनी चक्रीवादळासाठी आपत्ती निवारण विभागाची 34 पथकं सज्ज झाली आहेत. लोकांना घराबाहेर न पडण्याचं ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आवाहन
केले आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासन सज्ज असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com