#CycloneNivar : मुख्यमंत्री के.पलनीस्वामी यांनी बाधित क्षेत्राचा आढावा घेतला आढावा

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 26 November 2020

भारतीय पूर्व किनारपट्टीपर निवार नावाचे वादळ येऊन धडकले आहे. यामुळे तामिळनाडू, पुदुच्चेरीत वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे.

चेन्नई: #CycloneNivar live updates-

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी कुड्डोलोर जिल्ह्यातील देवनामपट्टीनम येथील निवार वादळ बाधितांची भेट घेतली. 

-DMK चे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी वेलाचेरी भागात जाऊन पाहणी केली. स्थानिकांनी स्टॅलिन यांनी कपडे आणि जेवण दिलं आहे.

-तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम ( O. Panneerselvam) यांचा चेन्नईतील पाणी साठलेल्या भागात पाहणी

-चेन्नईच्या मदिकापक्कम भागात रात्री झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे.

>

-बेंगळूरुमध्येही ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी

भारतीय पूर्व किनारपट्टीपर निवार नावाचे वादळ येऊन धडकले आहे. यामुळे तामिळनाडू, पुदुच्चेरीत वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 40 हजारांपेक्षा जास्त लोकांनी स्थलांतर केलं आहे. सध्याही किनारपट्टीवरील भागात वादळासह मोठा पाऊस सुरु आहे. तामिळनाडूत या वादळामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. तसेच 101 घरांची नासधूस झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव अतुल्या मिश्रा यांनी दिली आहे.

मागील 24 तासांत पुदुच्चेरीत (Puducherry) 23 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यातील मोठ्या भागात वीज खंडीत झाली आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यपालांनी येथे 26 आणि 27 नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर केली असून सार्वजनिक वाहतुकीवर बंद ठेवण्यात आली आहे.

कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा लाट आल्याने रेडझोनमधील व्यवहारांवर बंधने

मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामींनी घेतला परिस्थितीचा आढावा:
सुत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी राज्यातील विविध भागांची पाहणी करण्यासाठी दौरा केला आहे. त्यावेळेस बोलताना नारायणस्वामी (CM V Narayanasamy) म्हणाले की, आम्ही अशा प्रकारचा पावसाचा वेग पाहिला नव्हता. पुढील 12 तासांत वीज सुरळीत होण्याची शक्यता आहे. पुदुच्चेरीच्या कामराज नगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे.

बंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निवार चक्रीवादळ तयार झाले असून ते तमिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकले आहे. यादरम्यान १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. वादळ अतितीव्र होईल, तेव्हा वाऱ्याचा वेग प्रतितास १६५ किलोमीटरपर्यंत पोचेल, अशी माहिती चेन्नईतील हवामान विभागाचे उपमहासंचालक एस. बालचंद्रन यांनी सांगितले. वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. किनारपट्टीवर व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारीच कार्यालयात हजर राहिले आहेत. दक्षिण-पश्‍चिम रेल्वेने सात रेल्वे तर विमान कंपन्यांनी चेन्नईला येणारी व जाणारी विमाने रद्द केली आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CycloneNivar Live updates in Tamil Nadu and Puducherry V Narayanasamy