कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा लाट आल्याने रेडझोनमधील व्यवहारांवर बंधने

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 26 November 2020

कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा लाट आलेली असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउनबाबतचे नवे दिशानिर्देश आज जारी केले. त्यानुसार रूग्णसंख्या वेगाने वाढणाऱ्या प्रतिबंधित भागांत (कंटेन्मेंट झोन) अधिक सावधगिरी बाळगण्याची, रूग्णवाढीवर सतत नजर ठेवण्याची  व कोरोना विषयक आरोग्य नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकारांना करण्यात आलेल्या आहेत.

गृह मंत्रालयाचे ३१ डिसेंबरपर्यंत नवे दिशानिर्देश; अधिक सावधगिरीची सूचना
नवी दिल्ली - कोरोनाच्या संसर्गाची पुन्हा लाट आलेली असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउनबाबतचे नवे दिशानिर्देश आज जारी केले. त्यानुसार रूग्णसंख्या वेगाने वाढणाऱ्या प्रतिबंधित भागांत (कंटेन्मेंट झोन) अधिक सावधगिरी बाळगण्याची, रूग्णवाढीवर सतत नजर ठेवण्याची  व कोरोना विषयक आरोग्य नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य सरकारांना करण्यात आलेल्या आहेत. विशेषतः अशा भागांतील लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी सक्तीने आपापल्या घरातच थांबावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उद्धव ठाकरे यांच्यासह सात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांच्या प्रशासनांना दिलेल्या सूचना बारकाईने पाहिल्या तर, आजच्या दिशानिर्देशांचेही सूतोवाच त्यांनी कालच केल्याचे स्पष्ट होते. शहा यांनी सांगितले होते की कंटेन्मेंट भागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दर आठवड्यात रेड झोनचा दौरा करून तेथील परिस्थितीबाबत राज्य सरकारने मग नव्याने रणनीती आखावी. जास्त रूग्णसंख्या सतत येणाऱ्या कंटेन्मेंट झोनमधील व्यवहारांवर कठोर सक्ती वाढवून तेथील रणनीती नव्या पद्धतीने राबवावी. रूग्णवाढीचा वेग ५ टक्‍क्‍यांपर्यंत व मृत्यूदर एक टक्‍क्‍यांपर्यंतच रोखण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत. 

वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी कोरोना योद्ध्याचे निधन; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

गृह मंत्रालयाने राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांसाठी आज संध्याकाळी जारी केलेल्या नव्या दिशानिर्देशांनुसार कंटेन्मेंट भागांतील कोरोना नियंत्रणासाठी ‘पाळत व खबरदारी’ हे सूत्र सांगितले आहे. हे दिशानिर्देश एक ते ३१ डिसेंबर या कालावधीसाठी लागू राहणार आहेत.

Cyclone Nivar - तमिळनाडू, पुदुच्चेरीत पावसाचा धुमाकूळ; 40 हजार लोकांचे स्थलांतर

केंद्राचे दिशानिर्देश

  • गर्दीच्या ठिकाणी आरोग्य नियमांचे सक्तीने पालन करावे.
  • शक्यतो गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • कंटेन्मेंट भागांत केवळ जीवनावश्‍यक व्यवहारांनाच परवानगी 
  • राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केवळ कंटेन्मेंट भागांतच पुन्हा लॉकडाउन लावता येईल. 
  • कंटेन्मेंट भागाबाहेर लॉकडाउनसाठी केंद्राची परवानगी बंधनकारक 
  • ज्या शहरात कोरोनाच्या सक्रिय रूग्णवाढीचा दर १० टक्‍क्‍यांच्या पुढे आहे तेथे संबंधित प्रशासन व राज्यांच्या सरकारांनी नियमांच्या पालनाबाबत सक्तीने अंमलबजावणी करावी.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restrictions on transactions red zone due to re emergence of corona infection