Cyrus Mistry Dies : अदानींच्या हेलिकॉप्टरने मुंबईला जाणार सायरस मिस्त्रींचे पार्थिव

Cyrus Mistry  body will be taken to Mumbai by Gautam Adani's helicopter Cyrus Mistry Accidental Death
Cyrus Mistry body will be taken to Mumbai by Gautam Adani's helicopter Cyrus Mistry Accidental Death

मुंबई : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या रस्ता अपघातात सायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. या अपघातात जागीच त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या निधनानंतर सर्व स्तारातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सायरस मिस्त्री यांचे पार्थिव गौतम अदानी यांच्या हेलिकॉप्टरमधून मुंबईला नेण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासास सूर्या नदीवरील पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाला. अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दोघे जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Cyrus Mistry  body will be taken to Mumbai by Gautam Adani's helicopter Cyrus Mistry Accidental Death
Cyrus Mistry Death : कारच्या एअरबॅग्जही उघडल्या, मात्र...; समोर आले PHOTOS

यांनी ट्विट करून म्हटलं की, सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक उद्योगपती होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी ऐकून खूप दुःख झाले. ते एक गतिमान आणि हुशार उद्योजक होते. कॉर्पोरेट जगतातील एक तेजस्वी तारा आपण गमावला. हे भारतीय उद्योग जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.

Cyrus Mistry  body will be taken to Mumbai by Gautam Adani's helicopter Cyrus Mistry Accidental Death
Cyrus Mistry Dies : पत्नी रोहिका यांचं महत्त्वपूर्ण आवाहन; म्हटलं उद्या सकाळी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com