Cyrus Mistry Death: दोन मुले आणि पत्नी, जाणून घ्या सायरस मिस्त्री यांच्या परिवाराबद्दल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyrus Mistry Death

Cyrus Mistry Death: दोन मुले आणि पत्नी, जाणून घ्या सायरस मिस्त्री यांच्या परिवाराबद्दल

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सायरस मिस्त्री हे उद्योग क्षेत्रातील खुप मोठं नाव आहे. 2013 साली ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले पण अचानकपणे त्यांना २०१६ मध्ये अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. त्यानंतर ते बऱ्याच काळ रतन टाटांशी असलेल्या मतभेदामुळे चर्चेत आले. मिस्त्री सध्या शापूरजी पल्लोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते.

खरं तर मिस्त्री यांची बिझिनेस लाईफ कायम चर्चेत राहली. पण तुम्हाला त्यांच्या कुटूंबाबत किंवा कुटूंबातील सदस्यांबाबत माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया. (Cyrus Mistry survived by his wife and two sons know about his family and family members)

हेही वाचा: Cyrus Mistry सायरस मिस्त्री यांचा गुजरातवरून पालघरच्या दिशेने येताना झाला अपघात

सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला. त्यांचे वडिल पल्लोनजी मिस्त्री एक नामवंत उद्योगपती होते. त्यांची आई पॅटसी पेरिन दुबाश यांची झोरोस्ट्रियन धर्मावर श्रद्धा होती. मिस्त्री हा दोघा भावांपैकी पल्लोनजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा होता. त्यांचा मोठा भाऊ शापूर मिस्त्री हे आयरिश नागरिक असून त्यांचे लग्न बेहरोज सेठना यांच्याशी झाले आहे.

हेही वाचा: Cyrus Mistry Passes Away : Supriya Sule म्हणाल्या, 'रोड सेफ्टीबाबत आपण तितकी काळजी घेत नाही'

याशिवाय मिस्त्री यांना दोन बहिणीसुद्धा आहेत, लैला ज्या लंडनमध्ये राहतात. तेथिल पोर्टफोलिओ फंड मॅनेजर रुस्तम जहांगीरशी त्यांनी विवाह केला तर अलूने रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी विवाह केला.

सायरस मिस्त्री यांनी रोहीका छागला यांच्याशी विवाह केला. रोहीका छागलाचे वडिल पेशाने नामवंत वकील होते.रोहीका आणि सायसर यांना फिरोज मिस्त्री आणि जहान मिस्त्री अशी दोन मुले आहेत.

Web Title: Cyrus Mistry Survived By His Wife And Two Sons Know About His Family And Family Members

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..