D K Shivakumar : महाराष्ट्र एकीकरण समितीचे समितीचे लोकही कन्नडीगच, डी. के. शिवकुमार यांची जीभ वळवळली

Belgaum Black Day : एकीकरण समितीचे लोकही कन्नडीगच आहेत. त्यांचे परिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी मुक्ताफळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उधळली.
D K Shivakumar

महाराष्ट्र एकीकरण समितीचे समितीचे लोकही कन्नडीगच, डी. के. शिवकुमार यांची जीभ वळवळली

esakal

Updated on

Maharashtra Ekikaran Samiti : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावातील निदर्शनाबद्दल कोणतीही माहिती नाही. गृहमंत्र्यांकडे त्याबद्दल माहिती असू शकते. एकीकरण समितीचे लोकही कन्नडीगच आहेत. त्यांचे परिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी मुक्ताफळे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उधळली.

बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीने काळा दिनानिमित्त काढलेल्या अभूतपूर्व निषेध फेरीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते प्रतिक्रिया देत होते. ते म्हणाले की, कन्नड सक्तीनंतर सरकारी व खासगी संस्थांना लाल-पिवळा (कन्नड) ध्वज लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे. भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह बहुसंख्य मराठी भाषक सीमाभागात डांबल्याच्या निषेधार्थ समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषक एक नोव्हेंबरला काळा दिन पाळून गेली अनेक वर्षे निषेध करतात. महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतात. निषेध फेरीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

त्यामुळे बिथरलेल्या कन्नडीग पत्रकारांच्या प्रश्‍नावर शिवकुमार म्हणाले, ‘ज्याला कर्नाटकात राहायचे आहे, तो कन्नड असला पाहिजे. समितीच्या लोकांनीसुद्धा कर्नाटकच्या विधानसभेत प्रवेश केला आहे.’ इंग्रजी आणि हिंदीच्या हल्ल्यांपासून कन्नडचे आपण सर्वांनी संरक्षण केले पाहिजे. देशातील कोणत्याही राज्यात ध्वज किंवा राज्यगीत नाही, पण आमच्याकडे दोन्ही आहेत. आम्ही फलकांवर ६० टक्के कन्नड भाषा अनिवार्य केली आहे. आम्ही बंगळूरमधील उद्योग, कारखाने आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये राज्योत्सव साजरा करणे अनिवार्य केले आहे, असे ते म्हणाले.

‘नोव्हेंबर क्रांती’बद्दल बोलताना कोणीही कंटाळू नये. मी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जे काही सांगायचे ते सर्व सांगितले आहे. कोणत्याही नेत्याने ‘नोव्हेंबर क्रांती’सह कोणत्याही चर्चेने कंटाळून जाऊ नये. मुख्यमंत्री आणि मी बोललो आहोत. आपल्याला एवढेच म्हणायचे आहे. बाकी सर्व काही निरर्थक आहे, असे ते उपहासात्मकपणे म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीत ध्वजाबाबत निर्णय

पुढील मंत्रिमंडळ बैठकीत खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये लाल-पिवळा (कन्नड) ध्वज अनिवार्य करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. विधानसौध येथील भुवनेश्वरी पुतळ्याजवळ उपमुख्यमंत्री यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com