DA Hike : ऐन नवरात्रीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदींची भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

मोदी सरकारने 1 कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नवरात्रीकाळात मोठी भेट दिली आहे.
PM Modi
PM ModiSakal

DA Hike News : मोदी सरकारने 1 कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नवरात्रीकाळात मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे हा भत्ता आता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ जुलै ते डिसेंबर 2022 पर्यंत वैध असेल. ही वाढ 7 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्वीकारलेल्या सूत्रावर आधारित आहे.

PM Modi
Pankaja Munde : 'सनसनीखेज' बातम्यातून जमले तर...; पंकजा मुंडेंचं ट्वीट चर्चेत

सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्क्याने महागाई भत्ता दिला जात आहे. परंतु, महागाईचा भडका लक्षात घेता सरकारने त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर गेला आहे. या नव्या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय ऑक्‍टोबर महिन्यात मागील तीन महिन्यांची सर्व थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

PM Modi
Video : मोदी-शाह नव्हे,'यांच्या'मुळे झालो मुख्यमंत्री; CM शिंदेंचा चर्चेला पूर्णविराम

कमाल मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900

2. नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना

3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.19,346/महिना

4. महागाई भत्त्यात 21,622-19,346 ने किती वाढ झाली = रु 2260/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 2260 X12 = रु. 27,120

किमान मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000

2. नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना

3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना

4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.1080/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु 8640

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com