

डाबर या प्रसिद्ध कंपनीने रामदेव बाबांच्या पतंजलि विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलीय. पतंजलिच्या जाहिराती प्रसारीत करण्यात येऊ नयेत अशी मागणी डाबर कंपनीने केलीय. यामध्ये च्यवनप्राश उत्पादनांच्या जाहिरातीबाबत पतंजलि आय़ुर्वेदकडून अपमानास्पद जाहिराती लावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी डाबर कंपनीने याचिका दाखल केलीय. यात म्हटलंय की, पतंजलि आयुर्वेद त्यांच्या च्यवनप्राश उत्पादनांविरोधात अपमानास्पद जाहिरात दाखवत आहे. या जाहिराती प्रसारित करण्यास बंदी घालणारे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.