मुलासाठी बनवली मिनी रॉयल इनफिल्ड...

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

एका वडिलांनी आपल्या चिमुकल्यासाठी मिनी रॉयल इनफिल्ड तयार केली असून, ती चर्चेत आली आहे.

तिरुअनंतपुरम (केरळ): युवकांमध्ये रॉयल इनफिल्डची मोठी क्रेज आहे. हौस पूर्ण करण्यासाठी अनेकजण रॉयल इनफिल्ड खरेदी करताना दिसतात. मात्र, एका वडिलांनी आपल्या चिमुकल्यासाठी मिनी रॉयल इनफिल्ड तयार केली असून, ती चर्चेत आली आहे.

कोल्लम येथील एका वडिलांनी आपल्या सात वर्षाच्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी मिनी रॉयल इनफिल्ड तयार केली आहे. चिमुकला मिनी रॉयल इनफिल्ड चालवत असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुलाच्या वडिलांनी मिनी रॉयल इनफिल्ड ही घरीच तयार केली आहे. फायबरसह विविध वस्तूंपासून तयार केलेली दुचाकी हुबेहुब रॉयल इनफिल्ड सारखी दिसत असून, ती इलेक्ट्रिकवर चालते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dad from Kerala Builds Mini Royal Enfield Electric for His Son