Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

Sakal Podcast : दसरा मेळाव्याची उत्सुकता, शिंदे आणि ठाकरे गटांत चुरस

दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांत चुरस लागली आहे. दोन्ही गटांनी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जाण्यायेण्याची तसेच खाण्यापिण्याची सोय करणार असल्याचं सांगितलंय.

सकाळ पॉडकास्टमध्ये जगभरातील रोजच्या ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते. सकाळ अॅपसोबतच इतरही ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ते उपलब्ध आहे.

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

सगळ्यात आधी आमच्या सर्व श्रोत्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज पॉडकास्टमध्ये काय ऐकणार आहोत, ते पाहूया

मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत आज संपते आहे, त्यामुळे आज सरकार कोणती घोषणा करते, त्यावर मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.

दुसऱ्या बातमीत ऐकूया, चिनी कंपन्या भारतातील उत्पादनं का बंद करतायत? तर उद्या पुण्यामध्ये झोमॅटो, उबर, ओला डिलीव्हरी कर्मचाऱ्यांचा संप आहे. त्यांच्या काही विशेष मागण्या आहेत, त्या कोणत्या हे समजून घेऊ तिसऱ्या बातमीत.  

वेगवान घडामोडीत ऐकूया, फिरकीपटू बिशनसिंग बेदींचे निधन, अजित पवारांचा जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा, वाघनखाविषयी मराठी अभिनेत्यांची पोस्ट चर्चेत आणि एक देश एक निवडणुक विषयावर खुद्द निवडणुक आयोगानेच मागितला वेळ.

आजची चर्चेतली बातमी आहे, दसरा मेळाव्याची. ठाकरे आणि शिंदे गटात तर दसरा मेळाव्याची चुरस आहेच पण याखेरीज राज्यात आणखी ३ ठिकाणी दसरा मेळावे होत आहेत, शरद पवार, मोहन भागवत, पंकजा मुंडे यांसारखे नेते या मेळाव्यांत बोलणार आहेत. त्यामुळे कोणाचा मेळावा गाजणार, वाजणार याची उत्सुकता आहे.

१. मराठा आरक्षणाविषयी घाईत निर्णय घेणार नाही, फडणवीस

२. दिवाळीच्या तोंडावर चिनी कंपन्यांचा धक्कादायक निर्णय, भारतातलं उत्पादन करणार बंद

३. पुण्यात उद्या झोमॅटो, ओला, उबर डिलीव्हरी कर्मचाऱ्यांचा संप, गिग वर्कर्ससाठी कायदा आणण्याची मागणी

४. महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी काळाच्या पडद्याआड

५. जातीनिहाय जनगणनेवर अजित पवारांनी मांडली भूमिका

६. वाघनखावरची आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत

७. एक देश एक निवडणूक! आयोगाने मागितला आणखी वेळ

८. दसरा मेळाव्याची उत्सुकता, राज्यभरात पाच ठिकाणी दसरा सभा

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com