धर्मशाला : तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा (Dalai Lama) यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त, त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरु लागलीये. देशातील विविध राजकीय पक्षांचे सुमारे ८० खासदार या मागणीमागे उभे राहिले असून, ही शिफारस लवकरच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सादर केली जाणार आहे.