

Dehradun: उत्तराखंडमधील नवरात्रीच्या कार्यक्रमात पंजाबी गायक दलेर मेहंदी हे मद्यपानकरून गाणे गात असल्याचा आरोप झाल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. टिहरी जिल्ह्यातील कुंजापुरी येथे एका यात्रेमध्ये गायक दलेर मेहंदी हे गाणे सादर करत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल यांनी व्यासपीठावर जाऊन आक्षेप घेतला. दलेर मेहंदी यांनी मद्यपान करून गाणे सादर केल्याचा आरोप करत त्यांनी कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.