Crime News : बांदामध्ये दलित महिलेवर सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टमध्ये घातली दारुची..

महिला पतीसोबत दुचाकीवरून सासरच्या घरी जात होती.
UP Crime News
UP Crime Newsesakal
Summary

महिलेला तिच्या आईनं गावातील दोन तरुणांसह बाईकवरून तिच्या सासरच्या घरी पाठवलं आणि त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केलं.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील (Uttar Pradesh Banda) देहत कोतवालीमधील गुरेह गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा तीन तरुणांनी एका दलित महिलेवर (Dalit Women) बलात्कार केला.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) महिलेला पोलिस ठाण्यात नेलं, तिथं तिची चौकशी करण्यात आली. सामूहिक बलात्काराची ही घटना ऐकून पोलिसही चक्रावले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ती पतीसोबत दुचाकीवरून सासरच्या घरी जात होती. गुरेह गावाजवळ पतीच्या तीन मित्रांनी त्यांना रस्त्यात अडवलं. यावेळी पती दारूच्या नशेत होता, त्याचा फायदा घेत त्यांच्या मित्रांनी पतीला दुकानातून सिगारेट घेण्यासाठी पाठवलं.

UP Crime News
Joshimath Landslide : मंत्र्याचा थेट ISRO च्या संचालकांना फोन; वेबसाइटवरून तात्काळ हटवले 'ते' Photo

यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला, तर तिसर्‍यानं विरोध केल्यामुळं बलात्कार करण्यात अयशस्वी झाल्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बाटली घातली. रात्री उशिरा गँगरेपची बातमी मिळताच, सीओ सिटी अंबुजा त्रिवेदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेची विचारपूस केली.

UP Crime News
ISRO Report : समुद्राच्या काठावर वसलेली शहरं बुडण्याची शक्यता; ISRO नं जारी केला नवा अहवाल

कोतवालीचे प्रभारी अखिलेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिच्या आईनं गावातील दोन तरुणांसह बाईकवरून तिच्या सासरच्या घरी पाठवलं आणि त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळ गाठलं. महिला आणि तिच्या आईच्या जबानीत तफावत असल्यामुळं पोलीस घटनेची सत्यता जाणून घेण्यात व्यस्त आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com