भारतात अन्नधान्य वाटपात जातीय भेदभाव? दलित अद्यापही लाभापासून दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ration card

भारतात अन्नधान्य वाटपात जातीय भेदभाव? दलित अद्यापही लाभापासून दूर

नवी दिल्ली : देवंती देवी आणि सोनी देवी या दोघींमध्ये खूप सारे साम्य आहे. दोघीही तिशीत आहेत. बिहारच्या पूर्व भागातील एकाच जिल्ह्यातील त्या. नवी दिल्लीतच शेजारी-शेजारी राहतात. त्यांचे पती राजधानीत कचरा वेचण्याचे काम करतात. सोनी यांनी २००४ मध्ये विवाहानंतर राशन कार्डात त्यांचे नाव टाकण्यात आले. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरिबाला अन्नधान्य अनुदानित दरात मिळते. कोण तरी आला, आमचा अर्ज भरला, आमच्या कुटुंबाचे छायाचित्र नेले आणि त्यानंतर काही दिवसांनी माझ नाव रेशन कार्डात सासरच्या मंडळींबरोबर टाकण्यात आले, असे सोनी यांनी 'अल् जजिरा' ला सांगितले. (Dalits Face Discrimination In Public Distribution System In India)

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस म्हणाले, दलित असो की ब्राह्मण सर्व भारतीयांचा DNA एकच

मागील वर्षी कोरोना विषाणू संकटात सोनी यांना नवी दिल्लीत अन्नधान्य सरकारच्या एक देश, एक राशन कार्ड योजनेअंतर्गत मिळाले होते. या योजनेअंतर्गत राशन कार्डधारकाला कोणत्याही राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा (PDS) देशभरात लाभ घेतात. सोनी यांच्या प्रमाणेच देवंती यांनाही राशन कार्ड (Ration Card) मिळाले. तथापि लग्नाच्या काही वर्षानंतर तिच्या कुटुंबाचे नाव कार्डमधून काढण्यात आले. मला आठवते, जेव्हा माझा दुसरा मुलगा दोन वर्षांचा होता, तेव्हा एक अधिकारी आमच्या घरी आला आणि त्यांनी विचारले की राशन कार्डावर किती लोकांना अन्नधान्य मिळाले. अधिकारी म्हणाला, तुमच्यासारखे लोक सगळ राशन एकाच कुटुंबाच्या नावावर घेतात. मला ते काय म्हणाले हे कळाले नाही. एका महिन्यानंतर जेव्हा मी राशन दुकानात गेले, तेव्हा मला आढळले की माझ्या पूर्ण कुटुंबाचे नाव रजिस्टरमधून काढून टाकण्यात आले.

हेही वाचा: मोदींनी राशन दिलं, पण फडणवीस साहेब ते शिजवायचे की कच्चे खायचे?: उद्धव ठाकरे

राशन दुकानदार म्हणाला, की आमचे नावे यादीतून काढून टाकण्यात आले. सोनी हिचे आडनाव वर्मा, हे हिंदुतील उच्चवर्णीय आडनाव आहे. देवंती ही दलित (Dalit) आहे. हे एकेकाळी अस्पृश्य होते. ते भारतातील व्यामिश्र जातीय व्यवस्थेत सर्वात तळाला असतात. त्यांना उच्चवर्णीयांकडून भेदभाव केला जातो. दोन्ही महिला एकाच उत्पन्न गटात मोडतात. सोनी या सिमेंटच्या घरात राहतात. त्यांच्याकडे फ्रिज, कुलर आणि टीव्ही आहे. दुसरीकडे देवंती ही वाल्मिकी दलित आहे. त्या झोपडीत राहतात. त्यांच्या काही प्रमाणात साहित्य आहे. आम्ही राशन कार्ड मिळविण्यासाठी धडपड करत आहोत. प्रत्येक फेरीला आम्हाला ३०० ते ६०० रुपयांचे लाच मागितले जात होते. ही रक्कम आमच्यासाठी खूप मोठी आहे, असे देवंती यांनी सांगितले. मात्र सध्या आमच्याकडे राशन कार्ड नाही. राशन कार्ड केवळ लाच दिल्याने बनवून मिळू शकत नाही. आमच्या जातीतील अधिकारी असेल, तर आम्हाला ते मिळू शकेल. (Food Security)

Web Title: Dalits Face Discrimination In Public Distribution System In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top