'दंगल गर्ल' झायराकडून काश्‍मिरी जनतेची माफी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

श्रीनगर आमीर खानच्या "दंगल'मध्ये कुस्तीगीर गीता फोगट हिची लहानपणीची भूमिका करणारी झायरा वासिम हिने जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची शनिवारी (ता. 14) भेट घेतली. त्यावरून अनेकांकडून विशेषतः काश्‍मीरमधील तरुणांकडून प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे या आक्षेपार्ह कृतीबद्दल अन्‌ जनतेच्या भावना नकळत दुखावल्याने तिने सोशल मीडियावरून माफी मागतिली आहे.

काश्‍मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता झायराने मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने तरुणांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यामुळे तिने माफी मागितली आहे. तसेच "दंगल'मधील तिच्या भूमिकेविषयीही नाराजी व्यक्त करून याबद्दल आपल्याला अभिमान वाटत नसल्याचे तिने स्पष्ट "फेसबुक'वरून व्यक्त केले आहे. ""मी सर्वांची माफी मागते. ही कृती आपण जाणीवपूर्वक केलेली नाही. मी केवळ 16 वर्षांची आहे आणि हे लक्षात घेऊन लोक मला समजून घेतील अन्‌ माफ करतील, असेही तिने म्हटले आहे. काश्‍मिरी युवकांसाठी झायराला आदर्श मानले जाते. याबाबत तिने म्हटले आहे, की माझे अनुकरण कुणीही करू नये. तसेच आपला आदर्शही कोणी ठेवू नये, अशी आपली इच्छा आहे.

दरम्यान, झायरा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना भेटली म्हणून तिने माफी मागावी, असा दबाब कोणीही तिच्यावर टाकू नये, असे मत माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून व्यक्त केले आहे.

Web Title: dangal girl zaira wasim apologizes