धर्मासाठी झायराने घेतला चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय

धर्मासाठी झायराने घेतला चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय

श्रीनगर : पदार्पणातच रूपेरी मैदान गाजवीत राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरणारी संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झायरा वसिमने आज बॉलिवूडला कायमची सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत, कामाच्या स्वरूपाबाबत असलेले असमाधान तसेच धर्मश्रद्धांमध्ये त्याचा होत असलेला हस्तक्षेप, यामुळे काहीशा नाराज झालेल्या झायराने अखेर चित्रपट क्षेत्रातून कायमचे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. झायराने आज यासंदर्भात फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहीत आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली आहे. 

झायराने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जरी या क्षेत्रात मी पूर्णपणे फिट असली, तरीसुद्धा मी इथली नाही. पाच वर्षांपूर्वी मी घेतलेल्या निर्णयामुळे माझे आयुष्य कायमस्वरूपी बदलले. बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच माझ्यासाठी लोकप्रियतेची असंख्य दारे खुली झाली. मी लोकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू बनत गेले. यशाच्या संकल्पनेची देवदूत म्हणून मला सादर करण्यात आले आणि तरुणांसाठीचे रोल मॉडेलही ठरविण्यात आले. विशेषत: यश आणि अपयशाच्या संकल्पनांचा विचार केला, तर मी आयुष्यात कधीच काही ठरवून केले नव्हते.

या क्षेत्रात काम करताना माझ्या वाट्याला प्रेम, पाठिंबा आणि कौतुक सर्वच आले. पण, त्याने मला अज्ञानाच्या वाटेवरही नेले. या अज्ञानातच मी इमानातून (विश्‍वास) बाहेर पडून काही बदल घडवून आणले. या इमानाशीच खेळ करणाऱ्या वातावरणामध्ये मी काम करणे सुरू ठेवले होते. यामुळे माझे धर्मासोबतचे नाते धोक्‍यात आले होते. हाच इमान कसा कायम ठेवायचा म्हणून माझा संघर्ष सुरू होता. पण, दरवेळी मी अपयशी ठरले.'' 

तो शेवटचा सिनेमा 

चित्रपटसृष्टीतील वाटचालीमध्ये मी अजाणतेपणाने अनेक लोकांच्या हृदयात लालसा पेरली. या सर्वांना माझा एकच सल्ला आहे, की यश, प्रसिद्धी, अधिकार अथवा धन कोणत्याही प्रकारे विश्‍वास आणि शांतीपेक्षा मोठा असू शकत नाही, असेही तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. "दी स्काय इज पिंक' हा झायराचा शेवटचा सिनेमा ठरणार असून, या चित्रपटामध्ये तिने प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरसोबत काम केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com