एकाही मुस्लिमाला तिकीट न देणाऱ्या योगींनी एकाला दिलं थेट मंत्रीमंडळात स्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

एकाही मुस्लिमाला तिकीट न देणाऱ्या योगींनी एकाला दिलं थेट मंत्रीमंडळात स्थान

नवी दिल्ली : भाजप नेहमीच हिंदूंचं राजकारण करणारा पक्ष राहिला आहे. मुस्लिमांविरोधातील राजकारणाची थेट भूमिका घेणाऱ्या भाजपने यूपीमध्ये एकाही व्यक्तीला तिकीट दिलं नव्हतं. तरीही योगी आदित्यनाथ यांच्या नव्या मंत्रीमंडळात एक व्यक्ती मात्र, मुस्लिम असूनही मंत्री होणार आहे. दानिश आझाद (Danish Azad) योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील एकमेव मुस्लिम मंत्री ठरले आहेत. दानिश आझाद हे भाजपशी निगडीत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता राहिले आहेत. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश सरकारमध्ये भाषा समितीचे सदस्य राहिलेले दानिश आझाद यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवत भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश महामंत्री म्हणून पद दिलं होतं. (UP Cabinet)

हेही वाचा: शेवटी मुख्यमंत्री भाजपला म्हणाले, कुटुंबियांची बदनामी करु नका, मी येतो तुमच्यासोबत...

दानिश आझाद यांना आज योगी कॅबिनेटमध्ये सर्वांत युवा मंत्र्यांमध्ये स्थान मिळालं आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी सातत्याने अल्पसंख्यांक समाज आणि युवकांमध्ये राजकारण केलं आहे.

कोणत्याच सदनात सदस्य नाहीत

दानिश आझाद यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते अद्याप तरी यूपीच्या कोणत्याच सदनामध्ये सदस्य राहिलेले नाहीयेत. मात्र, त्यांना मंत्री म्हणून पदावर राहण्यासाठी विधानसभा अथवा विधान परिषदेमध्ये सदस्यत्वाची शपथ घ्यावी लागेल.

हेही वाचा: देशात कोरोनाची चौथी लाट ? काही राज्यांमध्ये नवीन व्हेरिएंटचे रग्ण

विद्यार्थी राजकारणापासून सुरुवात करणाऱ्या आझाद यांनी लखनऊ युनिव्हर्सिटीमधून बीकॉम आणि त्यानंतर मास्टर ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास केला आहे. ते जानेवारी 2011 मध्ये भाजपच्या विद्यार्थी संघटनेमध्ये सामील झाले त्यानंतर त्यांनी ABVP आणि RSS च्या तरुणांमध्ये आपलं वजन निर्माण करत वेगळी ओळख तयार केली. भाजपने एकाही मुसलमान व्यक्तीला विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट दिलं नाही. मात्र, मंत्रीमंडामध्ये दानिश आझाद अंसारी यांना राज्यमंत्री म्हणून समाविष्ट केलं आहे. गेल्या योगी सरकारमध्ये अल्पसंख्यांक कल्याण राज्य मंत्री, मुस्लिम वक्फ आणि हज मंत्री मोहसिन रजा यांना यावेळच्या कॅबिनेटमधून बाहेर काढण्यात आलं आहे.

Web Title: Danish Azad Yogi Adityanath Who Did Not Give Tickets To Any Muslim Gave A Direct Seat In The Cabinet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top