छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 5 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

पोलिसांच्या वाहनाला आईईडीच्या साहाय्याने हा स्फोट घडवून आणला. या स्फोटात छत्तीसगड आर्म फोर्सचे 3 जवान आणि डिस्ट्रिक फोर्सचे 2 जवान हुतात्मा झाले असून, दोन जवान जखमी झाले आहेत.

दंतेवाडा :  छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील चोलनार गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरुंग स्फोटात पाच जवान हुतात्मा झाले असून, दोन जवान जखमी आहेत. 

पोलिसांच्या वाहनाला आईईडीच्या साहाय्याने हा स्फोट घडवून आणला. या स्फोटात छत्तीसगड आर्म फोर्सचे 3 जवान आणि डिस्ट्रिक फोर्सचे 2 जवान हुतात्मा झाले असून, दोन जवान जखमी झाले आहेत.

नक्षलवाद्यांकडून हल्ल्याचे सत्र सुरूच असून, याआधी 13 मार्चला छत्तीसगडमधील सुकमा याठीकाणी सर्च ऑपेरशन करणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांवर आईईडी हल्ला केला होता. त्यात 9 जवान हुतात्मा झाले होते. 29 एप्रिल मध्ये एका गावात सार्वजनिक बैठकीसाठी निघालेल्या 29 जवानांच्या ताफ्यावर असाच हल्ला झाला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता. त्यानंतर, 2 मे रोजी गोरीबंद जिल्ह्यात आईईडी स्फोटात 2 जवान हुतात्मा झाले होते. यावरून नक्षलवाद्यांकडून पोलिसांवरील हल्ले वाढल्याचेच दिसून येते. 

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या सी60 कमांडोनी नक्षलविरोधी केलेल्या कारवाईत 50 पेक्षा जास्त नक्षवाद्यांना मारण्यात आले होते.

 

Web Title: dantewada 5 jawan killed in ied blast