सभेला हजारोंची गर्दी, उमेदवाराने भाषणाला केली सुरुवात तेवढ्यात...

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 29 October 2020

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच सुरु आहे. जदयू, संजद, भाजपा आणि काँग्रेसचे प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत.

दरभंगा: Bihar Election 2020- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच सुरु आहे. जदयू, संजद, भाजपा आणि काँग्रेसचे प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. अशातच स्मृती इराणींचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडताना दिसत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

काँग्रेसच्या प्रचारसभेत एक अपघात झाला आहे. कॉंग्रेसची प्रचारसभा सुरु असताना कार्यकर्ते घोषणा देताना आणि टाळ्या वाजवताना स्टेज अचानक कोसळला. त्या स्टेजवरील सर्व नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते कोसळले. झालं असं की, काँग्रेस उमेदवार मशकूर अहमद उस्मानी प्रचारसभेत बोलताना अचानक स्टेज कोसळला आणि ही दुर्घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठा व्हायरल होत आहे.

हेही वाचा- महिलेच्या छळाचा आरोप असणाऱ्या ABVP च्या नेत्याला मोदी सरकारचे 'गिफ्ट'

स्टेज कोसळण्यापुर्वी  मशकूर अहमद उस्मानी जोरजोरात घोषणा देत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. नंतर स्टेज काही प्रमाणात डगमगला आणि शेवटी कोसळला. चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

हा प्रकार दरभंगा येथे घडला. दरभंगामधून मशकूर अहमद उस्मान यांना तिकीट देण्यात आलं आहे. बिहार निवडणुकीत भाजपा आणि संजदची युती आहे तर कॉंग्रेस आणि जदयूची आघाडीची युती आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Darbhanga stage incident in Bihar legislative assembly