दार्जिलिंग पश्‍चिम बंगालमध्येच राहणार: ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

सिलिगुडी: दार्जिलिंग हा पश्‍चिम बंगालचा भाग असून, तो कायम राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केले.

गोरखालॅंडच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेची दुसरी फेरी आज पार पडली. या बैठकीत गोरखा जनमुक्ती मोर्चासह जीएनएलएफ, जेएपी आणि एबीजीएल या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 90 मिनिटे चाललेल्या या बैठकीत ममता यांनी मागणीवर ठाम असलेल्या संघटनांच्या काही मागण्या स्वीकारतानाच दार्जिलिंग पश्‍चिम बंगालमध्येच राहील, असे स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, ""येथे शांतता प्रस्थापित व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा असून, त्यासाठी प्रयत्न करण्यावर बैठकीत एकमत झाले. आंदोलनाची झळ बसलेल्यांना नुकसानभरपाई देणे, सार्वजनिक वितरण व्यवस्था (पीडीएस) कार्यान्वित करणे, आंदोलनात सहभागी सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे वेतन एक महिन्याच्या बोनससह अदा करणे, चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करणे, अशा इतर मागण्या स्वीकारण्यात आल्या आहेत.''
दरम्यान, चर्चेची तिसरी फेरी 16 ऑक्‍टोबर रोजी नबान्ना येथे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उपाय सुचवण्याचे आवाहन
दार्जिलिंगमधील अस्थिर राजकीय परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक पक्ष व संघटनांनी बंगाल सरकारला उपाय सुचवावेत, तसेच आपली मते मांडावीत, असे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठकीदरम्यान केले. याप्रश्नी केंद्र सरकारची मदत घ्यावी, असा प्रस्ताव ममता यांनी या वेळी नाकारला.

Web Title: Darjeeling will remain in West Bengal: Mamata Banerjee