तिसऱ्या दिवशीही दार्जिलिंग "बंद'

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल) - वेगळ्या गोरखालॅंड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चातर्फे (जीजेएम) आयोजित केलेल्या आंदोलनामुळे बुधवारी तिसऱ्या दिवशीची दार्जिलिंग "बंद' होते.

दार्जिलिंग (पश्‍चिम बंगाल) - वेगळ्या गोरखालॅंड राज्याच्या मागणीसाठी गोरखा जनमुक्ती मोर्चातर्फे (जीजेएम) आयोजित केलेल्या आंदोलनामुळे बुधवारी तिसऱ्या दिवशीची दार्जिलिंग "बंद' होते.

दार्जिलिंगमधील प्रसिद्ध चौक बझार व मॉल रस्त्यावरील बहुतेक दुकाने आज बंद होती. शहरातील अनेक भागांत पोलिस गस्त घालत असून अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. दुपारपर्यंत कोणतीाही अनुचित घटना घडली नसल्याचे सांगण्यात आले. सरकारी व "गोरखालॅंड टेरिस्टोरिअल ऍडमिनिस्ट्रेशन'ची (जीटीए) कार्यालये सोमवारपासून (ता.12) सुरू झाली आहेत. कर्मचाऱ्यांनी काम करू यासाठी "जीजेएम'ने चौक बझारमधील सरकारी कार्यालयावर मंगळवारी (ता.13) मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी त्यांना थांबविल्यावर संतप्त आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली होती.

Web Title: darjiling issue marathi news darjiling off