दार्जिलिंगमधील हिंसाचारामागे परकी शक्तींचा हात : तृणमूल

वृत्तसंस्था
रविवार, 9 जुलै 2017

कोलकता - दार्जिलिंगमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामागे परकी शक्तींचा हात असल्याचा सबळ पुरावा असल्याचा दावा तृणमूल कॉंग्रेसने रविवारी केला. दरम्यान, आज पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये चार पोलिस कर्मचारी जखमी झाले.

दार्जिलिंगमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी परकी भूमीतून पाठिंबा दिला जात आहे आणि त्याचा आमच्याकडे सबळ पुरावा आहे, असे तृणमूल कॉंग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले. पश्‍चिम बंगालला एकजूट ठेवण्यासाठी आम्ही आमचा लढा कायम ठेवू आणि आम्ही कधीच वेगळे होणार नाही, असेही संसदीय कार्य आणि शिक्षण मंत्री चटर्जी यांनी नमूद केले.

दरम्यान, गोरखालॅंड समर्थनार्थ आंदोलनाच्या 25व्या दिवशी आज दार्जिलिंगमध्ये पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडल्या. निदर्शकांनी एका पोलिस छावणीला लक्ष्य केल्यानंतर त्यामध्ये चार पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्याशिवाय निदर्शकांनी पोक्रीबॉंग येथील बीडीओ कार्यालयावरही हल्ला चढविला. पोलिसांनी गोळीबारात दोन समर्थकांना ठार केल्याचा आरोप करत गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चौकबजार येथे रॅली काढली होती.

Web Title: darjiling news marathi news sakal news