'डाटा लिक'प्रकरण ; भाजपचा आता काँग्रेसवर निशाणा

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

'हाय, माझे नाव राहुल गांधी आहे. मी भारताच्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. जेव्हा तुम्ही आमच्या अधिकृत अॅपवर साइन-अप कराल, तेव्हा तुमचा सर्व डाटा मी माझ्या सिंगापूरच्या मित्रांना देतो'.

नवी दिल्ली : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून वैयक्तिक डाटा लिक प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. नागरिकांची वैयक्तिक माहिती त्यांची कोणतीही परवानगी न घेता विदेशी कंपन्यांना पुरवली जाते, असा आरोप दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. काल (रविवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर आता भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींना त्यांनी केलेले आरोप खोडून काढत प्रत्युत्तर दिले.

Data hack

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत 'नमो अॅप'वरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या आरोपांना भाजपने राहुल गांधी यांना चोख प्रत्युत्तर दिले. 'नमो अॅप'वरून नागरिकांची वैयक्तिक माहिती अमेरिकेतील कंपन्यांना दिली जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला भाजपच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी प्रत्युत्तर देत राहुल आणि काँग्रेसवर निशाणा साधला. 

Data hack

'हाय, माझे नाव राहुल गांधी आहे. मी भारताच्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. जेव्हा तुम्ही आमच्या अधिकृत अॅपवर साइन-अप कराल, तेव्हा तुमचा सर्व डाटा मी माझ्या सिंगापूरच्या मित्रांना देतो, असे ट्विट करत मालवीय यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढवला. तसेच त्यांनी याबाबतचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत.

Web Title: Data Leak Issue BJP Attacked On Congress Shares App Users Data With Friends In Singapore Rahul Gandhi