esakal | देश सर्वात मोठ्या मंदीच्या दिशेने! इतिहासात पहिल्यांदाच जीडीपीमध्ये सर्वाधिक घट
sakal

बोलून बातमी शोधा

gdp.jpg

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारी आणि टाळेबंदीचा प्रभाव सकल राष्ट्रीय उत्पादनावरही (GDP)पाहायला मिळाला आहे.

देश सर्वात मोठ्या मंदीच्या दिशेने! इतिहासात पहिल्यांदाच जीडीपीमध्ये सर्वाधिक घट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना विषाणू (Coronavirus) महामारी आणि टाळेबंदीचा प्रभाव सकल राष्ट्रीय उत्पादनावरही (GDP)पाहायला मिळाला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये (एप्रिल-जून) भारताच्या जीडीपीमध्ये तब्बल २३.९ टक्क्यांची घसरण नोंद करण्यात आली आहे. या तुलनेत गेल्या तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये ३.१ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. २०१९-२० च्या या काळातील तिमाहीमध्ये ५.२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. सोमवारी सरकारकडून जीडीपीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. २१ लाख करोड रुपयांच्या आर्थिक मदतीनंतरही कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंदे उद्धवस्त झाले आहेत. तसेच याचा वाईट परिणाम सामान्य लोकांवर पडला आहे.
 
मुरब्बी आणि मुत्सद्दी प्रणवदा; मनमोहनसिंग मंत्रीमंडळाचे संकटमोचक

भारत सरकार १९९६ पासून जीडीपीची आकडेवारी जाहीर करत आला आहे. तेव्हापासून आतापर्यंतची ही सर्वाधिक घसरण आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. रिझर्व्ह बँकेने आर्थिक गतिविधींना चालणा देण्यासाठी मार्चपासून रेपो रेटमध्ये १.१५ टक्क्यांची कपात केली आहे.

जीडीपीच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वात मोठ्या मंदीची सुरुवात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ही मंदी पुढील काळातही राहण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीमुळे देशातील मागणी कमी झाली आहे. त्यामुळे देशातील आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या आहेत. सर्वसाधारणपणे सलग दोन तिमाहीत जीडीपीचा दर नकारात्मक राहिल्यास त्याला मंदी म्हटलं जातं.

असंघटित क्षेत्र संपवण्याचा मोदी सरकारचा डाव; राहुल गांधींचा गंभीर आरोप

मुख्य आर्थिक सल्लागार के सुब्रमण्यन यांनी पहिल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीचे ऑडिटकरुन निवेदन जारी केले. एप्रिल-जून तिमाहीमध्ये देशात टाळेबंदी होती. त्यामुळे सर्व गतीविधी पूर्णपणे बंद होत्या. पहिल्या तिमाहीतील जीडीपीमधील घसरण अनुमानानुसारच आहे, असं ते म्हणाले आहेत. 

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर वारंवार टीका केली आहे. आता वार्षिक पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीमध्ये घसरण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या टीकेची धार वाढणार आहे.

(edited by-kartik pujari)