kalvakuntla kavitha and k chandrashekar rao
sakal
हैदराबाद - तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या कन्या के. कविता यांनी आपल्या नवीन पक्षाचे नाव ‘तेलंगण राष्ट्र सेना’ (टीआरएस) ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मूळ पक्षाची ओळख असलेल्या ‘टीआरएस’ या नावाचा वापर केल्यामुळे, कविता यांचा हा नवा पक्ष त्यांचे वडील चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ला (बीआरएस) धक्का देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.